पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरुन आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. ‘राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला ३ कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहचात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो’, असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल ८ ते ९ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्यावर शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.
शंभूराज देसाईंनी उत्तर
‘हा व्हिडिओ मी आताच पहिला आहे. याची चौकशी आम्ही करू. आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या महिन्याभरात आपण पुण्यात ४९ हॉटेल आणि बारवर कारवाई केली आहे. तसेच पुण्यात सरप्राईज चेकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेऊन चौकशी करणार आहे. तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहोत’, असे सांगत शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘नाईट लाईफ’ला बंदी नाहीच; शहरातील ‘त्या’ हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य अन् ड्रग्ज पार्टी
-आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग
-शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा