पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे २ गट पडले. आता पक्षनाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर अजित पवार गटाचा पहिला युवक मेळावा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राकेश कामठे यांनी दिली. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय युवक पदाधिकारी मेळावा बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे 11 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यासाठी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार व राज्यातील सर्व युवक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं राकेश कामठे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हा पहिला युवक मेळावा असणार आहे. या मेळाव्यामध्ये युवक बांधणीसाठी नियोजन केले जाणार आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या मेळाव्यात अजितदादांच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचा पक्ष आम्हाला मिळाला आहे, या चांगल्या निर्णयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्व एकत्र जमणार असल्याचं राकेश कामठे यांनी सांगितल.
महत्वाच्या बातम्या-
-‘गुंडाने गुंडाचा काटा काढला हे खरं आहे की नाही? मोहोळ हत्याकाडांवर अजितदादांचं वक्तव्य
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी
-“परेड काढूनही मस्ती असेल तर…”; अजित पवारांचा गुंडांना इशारा