पुणे : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक एकमेकांवर चांगलीच आगपाखड करताना दिसत आहेत. सभागृहामध्ये महसूल विभागाच्या कामासंबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल विभागाच्या प्रश्नांवरील चर्चा थांबवण्याची मागणी केली. वडेट्टीवार यांच्या मागणीनंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील सभागृहाचे कामकाज बेकायदेशीर पद्धतीने चालले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अध्यक्ष महोदय मी काय या मंत्र्यांचे ऐकून बोलू…कोण लागून गेले हे मंत्री. मी यांचे ऐकायचे…तुम्ही आम्हाला शिकवू नका…मंत्री कुठे आहेत लाज वाटत नाही. अनुपस्थितीत असलेल्या मंत्र्यांना सभागृहामध्ये बोलवण्यात यावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यावर अजित पवारांनी उत्तर देत म्हणाले की, ‘विरोधी पक्ष नेते जे बोलतात ते ऐकून मला वाटत त्यांना बोलायचे नसेल.. असे नाही चालणार.’ सभागृहामध्ये यावरुन चांगलाच गदारोळ पहायला मिळाले आहे.
दरम्यान, अनेक मंत्री सभागृहामध्ये उपस्थित नसल्यामुळे झालेल्या शाब्दिक चकमकीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी ‘तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाचा वेळ वाया जातोय तर मंत्री कुठे आहेत, लाज वाटत नाही का?’ असे म्हणत अक्षरश: मंत्र्यांची लाज काढली आहे. विरोधकांच्या या आरोपवर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव घेत प्रत्युत्तर दिले. अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कधी चर्चेला होते?, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे आज हाती शिवबंधन बांधणार; गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेऊन मोरेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन
-मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत
-पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ भागात रेड अलर्ट