पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ते ‘मातोश्री’वर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. यामुळे वसंत मोरे यांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी न मिळाल्याने वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करुन पुण्याची लोकसभा निवडणूक लढवली. लोकसभेला पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेशासाठी इच्छुक असून ते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याआधी वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारीसंदर्भात संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण तेव्हा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट)तील बड्या नेत्यांची भेट देखील घेतली होती. मात्र, आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याने पुढे काय राजकीय घडामोड घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण
-‘आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला महिन्याला…’; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंवर प्रत्युत्तर
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’बाबत देवेंद्र फडणवीसांचे महिलांना आवाहन; म्हणाले, ‘एजंटच्या…’
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यासाठी सभापतींना दिलगिरीचं पत्र; निर्णय कधी?