पुणे : पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे हे गाड्यांचा ताफा, भगवे झेंडे घेत पुण्याच्या दिशेने जात आहेत. ‘मातोश्री’ येथे आज वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे हे पुण्याहून मुंबईच्या दिशेन जात असताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
जय महाराष्ट्र… pic.twitter.com/Fse4SL9RwI
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 9, 2024
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ‘आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो’, असे मोरेंनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यानंतर आज दुपारी ‘मातोश्री’ या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे. वसंत मोरे या आधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते.
मातोश्रीच्या दिशेने रवाना…
जय महाराष्ट्र… pic.twitter.com/HHrrldis0k
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 9, 2024
लोकसभा निवडणुकीपुर्वी पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. महाविकास आघाडीतील नेत्यांची भेटही घेतली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करत असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांनी केलेल्या पाठपुराव्याला यश; पुणे विमानतळावरचे नवे टर्मिनल ‘या’ दिवसापासून सेवेत
-पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ भागात रेड अलर्ट
-विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’
-जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?