पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर ते कोणते पक्षात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र त्यांनी आपल्या राजकीय भविष्याची दिशा गुरुवारी स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज मोरे हे शरद पवार गटाच्या पुण्यातील कार्यालयामध्ये पोहचले.
शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटातून परतलेले आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला रामराम केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला. मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले.
“मी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रिया सुळे यांनी आजची वेळ दिली होती, म्हणून मी आलो होतो. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली, शिवसेना नेत्यांशी पण केली. पुण्यात एक वेगळा प्रयोग होऊ शकतो. कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशाप्रकारे उमेदावर असू शकतो हे सांगायला मी शरद पवारांकडे आलो होतो”, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
“मी शरद पवारांना सांगितला आहे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत ते इतर मोठ्या नेत्यांना देखील सांगू शकतात समजू शकतात. पुढील दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या मंचावर आले पण प्रवेश टाळला; निलेश लंकेंना नेमकी भीती कशाची?
-विजय शिवतारेंनी केला प्रचाराचा श्रीगणेशा; कन्हेरीच्या मारुतीच्या चरणी नतमस्तक
-‘मावळचे पुढचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार’; उदय सामंत यांचा विश्वास
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराचा नारळ फुटला; कै. गिरीश बापटांच्या प्रतिमेला अभिवादन
-‘..तर आमदाराकी सोडावी लागेल’; अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा