पुणे : पुणे शहरासह राज्यात दमदार हजेरी लावली आहे. पुण्यात सलग ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरात अनेक भागात पाणी साठले आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी साचत आहे. शहरातील रस्ते पाण्याने गच्च भरले आहेत, जणू काही रस्त्यांनी नद्यांचे रुप धारण केले आहे. पुणे शहरात एका दिवसात 100 मिलीमीटर पाऊस पडला आहे. शहरात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नागिरकांना अक्षरश: पाण्यातून पोहत घरी पोहचावे लागले.
आजही पुण्यात काही भागात पाऊस पडला असून रस्त्यावर चांगलेच पाणी साठले आहे. यावरुन शहरात मनसेकडून हटके आंदोलन करण्यात आले आहे. आतापर्यंत या ठिकाणी मनसेचे माजी नेते वसंत मोरे आणि सध्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे दोघे एकत्र आंदोलन करत होते. पण आता वसंत मोरे यांनी निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
मुसळधार पावसामुळे शहरात झालेल्या पाण्यावरुन नागरिकांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. अशातच “प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती पुणेकरांवरती ओढावली आहे”, असे म्हणत सोमवारी पुणे महापालिकेसमोर मनसेकडून आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनामध्ये वसंत मोरे यांच्या स्टाईलची झलक पाहायला मिळाली. याआधी ज्याप्रमाणे वसंत मोरे हे महापालिकेच्या विरोधात बोट घेऊन आंदोलन करत होते आज त्याच पद्धतीने साईनाथ बाबर यांनी आंदोलन केले. त्यामुळे आजच्या साईनाथ बाबर यांच्या आंदोलनामध्ये वसंत मोरेंचीच चर्चा होती.
महत्वाच्या बातम्या-
-‘…अन् थेट मंत्रिपदाची माळ तुझ्या गळ्यात’; प्रवीण तरडेंनी मोहोळांसाठी केली खास पोस्ट
-“हे तुमच्या पचनी पडणारे नाहीच…” मंत्री मुरलीधर मोहोळांनी सुप्रिया सुळेंना सुनावलं
-सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार करत केंद्रात मंत्रिपद द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी मागणी
-‘मैं दुसरों के घर मे क्यू झांकू’; सुप्रिया सुळेंचा निशाणा कोणाकडे?