पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणी आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणी पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत ३ अल्पवयीन तसेच २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून ८ पिस्तुलं, १३ काडतुसं, ७ दुचाकी मोटारी जप्त करण्यात आली आहे.
वनराज हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आंदेकरांची बहिण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश कोमकर, दीर गणेश कोमकर, मुख्य सूत्रधार असलेले सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते यांना अटक केली आहे. तसेच आरोपींना पिस्तुल पुरविणारा संगम वाघमारे यालाही अटक केली आहे. पसार झालेल्या आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाने रात्री उशीरा अटक केली.
दरम्यान, वनराज आंदेकर यांना नाना पेठेतील घरापासून थोड्या अंतरावर असताना रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ८-१० जणांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होत असतान तिथे त्यांचा मुलगा शुभम आंदेकरही उपस्थित होता. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या शुभम आंदेकर याच्या जिवाला धोका असल्याचे लक्षात घेता पोलिसांकडून त्याला संरक्षण देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! एक कॉल तुमचं बँक अकाऊंट साफ करू शकतो; ८ महिन्यात २८ कोटींची लूट
-पुण्यात तीन जागांवर महायुतीची डोकेदुखी; भाजपसह राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या दाव्याने चुरस
-पुणेकरांना आता शहरातील ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहता येणार; शहरात लागणार डिजीटल बोर्ड
-पुणे गणेशोत्सव: शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते आजपासून बंद; पर्यायी मार्ग कोणते?