पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराडची पुण्यात असलेल्या संपतीची गेले काही दिवस चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच आता पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्येही वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. बीड आणि परळीमध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने राज्यातील वेगवगेळ्या शहरामध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे.
शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने २५ कोटी रुपये खर्चून ६ ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात आता ईडीची कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. या इमारतीत वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधि एक महिला तसेच विष्णू चाटे यांच्या नावाने एकूण ६ ऑफिस स्पेसेसचे बुकिंग करण्यात आले आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल्डरसोबत त्यांचा व्यवहार पूर्ण होणार होता. पण त्याआधीच संतोष देशमुख खून प्रकरणी कराड आणि त्याच्या टोळीवर आरोप करण्यात आले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी झालेल्या आरोपानंतर वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला. त्यानंतर कराडच्या पुण्यातील संपत्तीबाबत खुलासे होत आहेत. तब्बल २५ कोटी रुपये देत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केल्याचे आता समोर आले असून आता या प्रकरणात ईडीचा एन्ट्री होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे तिथे काय उणे! पुणेकर वाहतूक कोंडीतही ठरले अव्वल
-पुण्यात लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद; अन् ५ मिनटापूर्वीच आला ‘तो’ फोन
-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…