पुणे : पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी मतदारसंघ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ भाजपला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला जाणार असल्याची तुफान चर्चा आहे. कारण येथे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आला आहे. अशातच भाजपने देखील पुण्यातील हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवार निवडीसाठी पदाधिकाऱ्यांचे मतदान घेतले नाही. यावरुन हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला राहणार असल्याचं स्पष्ट दिसतंय.
भाजपला मानणाऱ्या वडगाव शेरी मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून वडगाव शेरी विधानसभा भाजप लढवणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. तर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी आग्रह धरला असून नुकतेच त्यांनी मतदारांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले आहे.
या पत्रातून जगदीश मुळीक यांनी मतदारांना केलेले भावनिक आवाहन प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्यामुळे मतदारसंघ भाजपच्या वाट्यालाच जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोणतेही पद नसतानाही जगदीश मुळीक यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, पहिल्या टर्ममध्ये केलेली विकासकामे आणि मुळीकांचे फडणवीस यांच्याशी असलेले निकटचे संबंध. तसेच, वरिष्ठांनी विधानसभा लढवण्यासाठी दिलेला ग्रीन सिग्नल या सर्व बाबी पहाता वडगावशेरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बालेकिल्ल्यात अजितदादांना आणखी एक मोठा धक्का; ‘या’ नगरसेवकानं साथ सोडताच केली जहरी टीका
-नितीन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट; वडगाव शेरीबाबत काय होणार निर्णय?
-वडगाव शेरीत भाजपनं टाळलं पदाधिकाऱ्यांचं मतदान, मुळीकांची आशा मात्र कायम
-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला