पुणे : माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना दुपारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उषा काकडे यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. रुबीहॉल हॉस्पिटलकडून त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र शनिवारी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या चर्चेला उधाण आले.
कौटुंबिक वादातून उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. दरम्यान त्यांच्या आरोग्याबाबत रुबी हॅास्पिटलकडून फूड पॅायझनिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दुपारी ४-४:३० वाजताच्या सुमारास उषा काकडे यांना गंभीर अवस्थेत खासगी वाहनातून त्यांच्या केअरटेकर आणि नोकरांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: गौरव आहुजाने माफी मागितलेले शिंदे साहेब नेमके कोण?
-संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?
-लेकाच्या संतापजनक कृत्यावर बापाची प्रतिक्रिया; ‘तो माझा मुलगा, त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या…’
-बड्या बापाच्या लेकाचा माज; दारुच्या नशेत रस्त्यावर अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ