पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व स्तरावर टीका करण्यात येत आहे. सर्व स्तरावर विविध प्रकारे अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. या प्रकरणामध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. तसेच प्रकरण चिघळल्याने प्रशासनाने देखील कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. राजकीय नेत्यांनी यावरुन अनेकांना धारेवर धरले आहे.
या प्रकरणावरुन आता राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. २९) तक्रार करण्यात आली असून त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे चरणसिंह राजपूत हे आता चांगलेच अडणीत येण्याची शक्यता आहे. ‘या अपघातानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हफ्ते घेऊन बेकायदेशीर बार आणि पब सुरु आहेत”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे.
त्यातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर पुणे पोलीस कोणत्या बार आणि पबमधून किती पैसे घेतात. तसेच कोणमार्फत हे पैसे येतात. त्या सर्व बार, पब आणि हफ्ते घेणाऱ्यांची नावे वाचून दाखवली आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देखील धाबे दणाणले आहेत.
शहरातील ‘नाइटलाइफ’ला पाठीशी घालणारे उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना धंगेकर आणि अंधारे यांनी चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, राजपूत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राजपूत यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार, डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडण महागात पडणार? नेमकं काय घडलं?
-पुणे पोलिसांकडून कॅफेवर छापा; धक्कादायक वास्तव आलं समोर, अंधारात…
-‘थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स करणाऱ्याला समज द्या’; अंजली दमानिया कोणामुळे संतापल्या?
-‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, पण…’, कालीचरण महाराजांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य