पुणे : मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऐन वेळचे किंवा तातडीचे म्हणून काही विषय मंजूर केले जातात. पण याबाबतची माहिती सार्वजनिक जाहीर केली जात नाही. या विषयांची माहिती संकेतस्थळावरही दिली जात नाही, अशी तक्रार आता आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे केली आहे.
‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या विषयांची माहिती संकेतस्थळावर न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. मंत्रिमंडळात आयत्या वेळचे ठराव ताबडतोब किंवा आपत्कालीन परिस्थितामध्ये मांडायचे. ठराव मंजूर झाल्यानंतर त्यासंदर्भात माहिती संकेतस्थळावर देणा आवश्यक असते. पण ही माहिती देणे रखडून राहिले आहे. माहितीच्या अधिकारात मागितल्यानंतरही ही माहिती विस्तृत स्वरुपाची आहे असं म्हणत ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आहेस असे विजय कुंभार यांचे म्हणणे आहे. त्यांनी तसे तक्रारीत नमूद केले आहे.
गेल्या ५ वर्षांत मंत्रिमंडळाच्या २०९ बैठका झाल्या. या बैठकीतील महत्वाची माहिती संकेतस्थळावर आहे. मात्र, ऐन वेळच्या ठरावाची माहिती लपविण्याचे किंवा ती सार्वजनिक न करण्याचे कारण काय? अतिरिक्त कार्यसूची तयार असताना माहिती सार्वजनिक का केली जात नाही? असा सवाल विजय कुंभार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“नातं हे नात्याच्या जवळ ठीक, पण अजितदादा एखादी भूमिका घेतात तेंव्हा…” सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या
-भोसरीत आढळरावांच्या पाठीशी लांडगे अन् लांडेंची ताकद! विलास लांडेंच्या भेटीनंतर आढळरावांचे पारडे जड
-लोकसभेच्या लगीनघाईत व्हायरल झाली ‘ती‘ पत्रिका! पुण्याच्या राजकारणात जोरदार चर्चा
-मोदींच्या विकासाच्या कामावर नागरिकांना विश्वास, पुणेकरांची मन आम्ही जिंकली आहेत – मोहोळ