पुणे : देशाच्या राजकारणामध्ये सर्वात महत्वाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांनी या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली तर उद्धव ठाकरेंची शिवसेनादेखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. याबाबत चर्चाही सुरु झाली. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही गोष्ट नाकारल्याचं पहायला मिळालं आहे. ‘उद्धव ठाकरे असा निर्णय घेणार नाहीत’, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे ते उद्धव ठाकरेंसाठी सकारात्मक बोलले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
“अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात माहिती नाही. पण मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक शरद पवार आहेत. शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील,” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. “मी शरद पवारांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती हे अजित पवार यांनी म्हटलं ते स्पष्ट आहे. शरद पवार यांच्यासोबत अजित पवारांनी पक्ष उभा केला. आपल्याला पक्षामध्ये स्थान मिळणार नाही, हे कळल्यावर अजित पवारांना पक्षातून बाहेर निघावं लागलं,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही”
-“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल
-विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप