पुणे : स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मध्यरात्री १-२च्या सुमारास शिरुरमधील गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने दत्ता पोलिसांच्या हाती लागली. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला स्वारगेट पोलिस स्टेशनला आणले असून त्याला आज दुपारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. दत्ता गाडेची पहाटेपासून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.
दत्तात्रय गाडेच्या कोठडीत टाहो फोडत होता. ‘माझं चुकलं मी पापी आहे. पण मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले आहेत’, असे सांगत दत्तात्रय गाडे पोलिसांसमोर दावा केला आहे. दत्ता गाडेने पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पिडीत तरूणी आरोपीवर असे खाेटे आरोप का करत आहे?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, आरोपी दत्ता गाडे हा बलात्कार केल्यापासून त्याच्या गुनाट या गावी ऊसाच्या शेतात लपून बसला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची १३ पथके तपासात गुंतली होती. डॉग स्कॉड, ड्रोनद्वारे पोलिस गाडेचा शोध घेत होते. मात्र, तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दत्ता गाडेला सध्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. तिथे त्याची चौकशी सुरु आहे. त्याला आता दुपारी २ वाजताच्या सुमारास न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार: पुणे पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुस्क्या आवळल्या; कुठे सापडला दत्तात्रय गाडे?
-Pune: स्वारगेट अत्याचार प्रकरणी पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया म्हणाले,…