पुणे : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत आहे, तर दुसरीकडे एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. चित्रा वाघ यांच्या या टीकेला आता शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं आहे.
“पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला, आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं”, असे म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं. या ऍपवर जाणारे प्रोग्राम सेन्सॉर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझ याच ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या प्रश्नाला प्रत्त्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’
-पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान
-“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार
-“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं