सोलापूर | पुणे : सध्या महिलांचे ‘एक्ट्रा मॅरिटल अफेअर्स’ म्हणजेच विवाहबाह्य संबंध असल्याचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत आहे. आयुष्यभर नवऱ्यासोबत राहणं सध्या महिलांना नकोसं झालं आहे. आतापर्यंत पुरुषांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे वारंवार कानी पडत होतं मात्र आता याउलट महिलांनी देखील कळस गाठला आहे. या फक्त विवाहबाह्य संबंधच ठेवत नाहीत तर प्रियकरांच्या साथीने नवऱ्याची हत्या करताना पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मेरठमधील मुस्कानने प्रियकराच्या मदतीने तिच्या नेव्ही ऑफिसर पतीची हत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक अशी प्रकरणे समोर आली. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून अशीच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीवरुन, पांगरी गावातील रूपाली पटाडे (वय ३५) आणि शंकर पटाडे (४०) यांचा प्रेमविवाह झाला होता. शंकर हा गाडीचालक होता तर रूपाली ही घरकाम करत होती. सुखाचा संसार सुरु असतानाच रूपाली बार्शीतील २६ वर्षीय गणेच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु झाले. रुपालीचा पती शंकरला याबाबत समजताच त्याने तिला गणेशचा नाद ताबडतोब सोडण्यास सांगितले. मात्र, शंकरसोबत प्रेमिवावाह करुनही रुपाली गणेच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे गणे आणि रुपाली या दोघांनी मिळून शंकरचा काटा काढण्याचा निर्णय घेतला अन् शंकरच्या खूनाचा कट रचला.
शंकरचा काटा काढण्यासाठी गणेश सपाटे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मित्रांसोबत शंकरला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. दोघेही दारु पिऊन टल्ली झाले. गणेशने शंकरला धाराशिवला कलाकेंद्रात जाऊ असे म्हणत कारमध्ये बसवलं. गणेशने केलेल्या प्लाननुसार एका पुलावर गाडी थांबवायला सांगितली. तिथे मध्यरात्रीच दोघांनी डान्स केला फोटो काढले. त्यानंतर गणेशने शंकरला खांद्यावर घेतले आणि पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंकरने गणेशला मारलेली मिठी सोडलीच नाही. त्यामुळे गणेश सुद्धा शंकरसोबत पाण्यात पडला आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आता चौकशीसाठी रूपालीला ताब्यात घेतलं अन् सत्य प्रकरण बाहेर पडलं.
दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी रुपालीला बेड्या ठोकल्या असून नवरा आणि प्रियकर सुद्धा गेला आणि स्वतः जेलवारीसाठी गेली आहे. सुखाचा संसार सोडून रुपालीने विवाहबाह्य संबंध ठेवले. दुसरी लव्ह स्टोरी सुरु केली मात्र, तिच्या दोन्ही लव्ह स्टोरींचा दुर्दैवी ‘द एन्ड’ झाला अन् तिची जेलवारी सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
-कुख्यात गुंड निल्या घायवळला पैलवानाने भर मैदानात लगावली कानशिलात; नेमकं कारण काय?
-हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार, पुण्यात नेमकं घडतंय काय?
-पुणेकरांसाठी खुशखबर! यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीची चिंता मिटली
-‘मी फक्त सरकामधील घटक पक्षाचा आमदार, त्यामुळे…’; छगन भुजबळांनी पुन्हा एकदा ‘ती’ सल बोलून दाखवली
-दीनानाथ रुग्णालय प्रकरणात भाजप आमदाराचा यूटर्न; जयंत पाटलांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ