सातारा : लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याला अवघे ४ दिवस बाकी आहेत. महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. मात्र आता साताऱ्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती मिळत आहे.
शशिकांत शिंदे हे येत्या १५ तारखेला ११ ते २ या वेळेत सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शरद पवार गटाकडून मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील महाविकास आघाडीच्या संयुक्त परिषदेत साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना साताऱ्यात महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. शरद पवार स्वत: शशिकांत शिंदे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी साताऱ्यात हजर राहणार आहेत. या अनुषंगाने साताऱ्यामध्ये शरद पवार गट आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर
-Shirur Lok Sabha | “त्यांच्यासाठी जीवाच रान केलं, पण…” दिलीप मोहितेंचा अमोल कोल्हेंवर प्रहार
-“मोदी म्हणाले, मी तुमचं बोट धरुन राजकारणात आलो, मला बोटाची काळजी..”; शरद पवारांचा खोचक टोला
-“अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही”; अजित पवारांनी संजोग वाघेरेंना धरलं धारेवर