पुणे : पुणे शहरामध्ये एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकरणावरुन शहरात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारला वारंवार धारेवर धरणाऱ्या काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा पुणे पोलीस आणि सरकारला धारेवर धरलं आहे. पुणे पोलिसांची कारवाई म्हणजे केवळ नौटंकी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण असेल किंवा नुकताच उघडकीस आलेलं ड्रग्ज प्रकरण असेल, या प्रकरणांमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. सध्या ज्याप्रकारे कारवाई करण्यात येत आहे, ती संपूर्णपणे नौटंकी आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
आम्ही दोषींवर कारवाई करतोय, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असून जोपर्यंत या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होत नाही आणि त्यांना तुरुंगात टाकलं जात नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, अशी प्रतिक्रियाही रविंद्र धंगेकरांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुणे शहर भयमुक्त करा, जमत नसेल तर पायउतार व्हा’; राष्ट्रवादीचा शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
-केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या प्रयत्नानंतर पुणे विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी
-Pune Drugs Party: शहरातील पब्जवर जिल्हाधिकाऱ्यांची असणार करडी नजर
-‘हे घरात यायची वाट पाहणार का?’ पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन पिट्याभाईची आणखी एक आक्रमक पोस्ट
-अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ