पुणे : गेल्या ३ वर्षांत न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढण्याचा नारा देणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
“येत्या २ ते ३ महिन्यात राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. कारण सत्ताधाऱ्यांना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा होता तो आता संपलेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होतील”, अशी अपेक्षा प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
“पुण्याचा विचार केल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची मानसिकता आहे. कारण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी हे शहर लुटण्याचं काम केलं आहे. त्यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी ४ पावलं मागे येऊन सर्वांचा मान सन्मान ठेवून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. मात्र, वेळ पडल्यास स्वबळावरही आम्ही लढण्याची तयारी ठेवली आहे.”, असेही प्रशांत जगताप म्हणाले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी फूटणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेनंतर लक्ष महापालिकेवर, ८ मतदारसंघात भाजपची सदस्य नोंदणी जोरात
-लोकसभा, विधानसभा झाली तरीही पवार विरुद्ध पवार सामना सुरुच; बारामतीत नेमकं काय घडतंय?
-पुण्यात १४ ते २२ डिसेंबर पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन
-सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांकडून चौघे ताब्यात; धक्कादायक माहिती आली समोर