पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या महिला अत्याचार, नुकतेच सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प तसेच बीड हत्याकांड, धनंजय मुंडे अशा अनेक मुदद्यांवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगितुरा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांची या कार्यक्रमातील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये सुप्रिया सुळे यांनी अनेक धक्कादायक वक्तव्यं केली आहेत.
‘धनंजय मुंडे यांच्याविरोधात ते पक्षात असताना देखील माझी लढाई सुरु होती. मला कधी कधी वाटतं, बरं झालं पक्ष फुटला. कारण या सगळ्या प्रकारानंतर एकतर ते तरी पक्षात राहिले असते किंवा मी तरी पक्षात राहिले असते. जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करु शकत नाही. ते पक्षात असतानाही माझी त्यांच्याविरोधात लढाई सुरु होती’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
‘माझं घर कंत्राटाच्या पैशांवर चालत नाही’
‘जो माणूस स्वत:ची पत्नी, मुलांची आई असलेल्या महिलेच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही. मी आज याबाबत पहिल्यांदा बोलत आहे. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही. माझं घर कंत्राटाच्या पैशांवर चालत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी एकदा तरी जाऊन भेट द्या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे. महादेव मुंडेंच्या पत्नीने मला विचारलं की, त्या सगळ्यात माझ्या लेकरांची काय चूक होती?’ या प्रश्नावर मी काय उत्तर देणार? संतोष देशमुख यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्या आईने माझा हात धरला होता. आम्हाला न्याय देशील, असा शब्द दे सुप्रिया, असं त्या म्हणाल्या. मी त्यांना संतोष देशमुख यांना न्याय देण्याचा शब्द देऊन आले’, असे सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती’, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक
-स्वारगेट बस अत्याचारानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग; ‘त्या’ बसचा होणार भंगारात लिलाव
-सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढला; आजपासून गाय, म्हशीच्या दूध दरात २ रुपयांनी महागले
-पुण्यात महिला असुरक्षितच; स्वारगेट प्रकरणानंतर आता आणखी एका तरुणीवर अत्याचार