पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या गुलाबी कोटची कालपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यात अजित पवारांनी गुलाबी रंगाचा अधिक वापर करुन पोस्टर्स, जाहिराती, तसेच बारामतीमध्ये घेतलेल्या जन सन्मान रॅलीमधील कार्पेट किंवा सर्वाधिक गुलाबी रंगाचा केलेल्या वापरावरुन आणि मुख्य म्हणजे अजित पवारांनी देखील गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. यावरुन मतदार महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अजित पवारांनी ही राणनिती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावरुन खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांना खोचक टोला लगावला होता. त्यावरुन प्रश्न विचारला असता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
‘येथे प्रत्येकानेच वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत. मला कोणते कपडे परिधान करायचे? हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणाच्या पैशाने मी माझे कपडे घेतो का? जे कपडे सामान्य माणूस घालतो, तेच कपडे मी परिधान करतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करतो, असे अजित पवार म्हणाले आहेत.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
‘अजितदादा गुलाबी जॅकेट घालतात. त्यामागचा हेतू राज्याचे वातावरण गुलाबी करण्याचा असू शकतो. मात्र, तसं काही होईल असं मला वाटत नाही. कारण जॅकेट घालून कधी राजकारण होत नाही’ असा खोचक टोला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली
-अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”
-अजित पवारांच्या गुलाबी कोटवरुन अमोल कोल्हेंचा खोचक टोला म्हणाले, ‘त्यामागचा हेतू राज्याचं…’