पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या तीन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवरुन सर्व राजकीय पक्षांकडून तसेच विविध संघटनांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. हे प्रकरण इतके पेटले की रुग्णालयाची संपूर्ण कुंडलीच काढण्यात आली. त्यामध्ये पालिकेचा थकवलेला कर किती याची देखील माहिती समोर आली. अशातच आता रुग्णालयचा आता आणखी एक प्रताप समोर आला आहे.
ज्या जागेवर दीनानाथ रुग्णालय उभे आहे ती जागा पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी दिली होती. त्यांचाच मृतदेह या रुग्णालयात देवण्यास नकार देण्यात आला होता, असा आरोप त्यांच्या मुलाने केला होता. त्यानंतर आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यात एका डॉक्टरांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. मात्र बिल न भरल्यामुळे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता, हे देखील आता समोर आले आहे.
२६ वर्षे रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील रामपूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. भारत मारुती लोटेंनी सेवा दिली. राज्य सरकारने त्यांच्या सेवेचा गौरव देखील केला होता. गोरगरीबांसाठी कौतुकास्पद कार्य केलेल्या भारत लोटे यांच्या आयुष्याच्या शेवटी अनेक यातना सहन कराव्या लागल्या. एक डॉक्टर असूनही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले.
डॉक्टर लोटे यांच्या पत्नी संगीत लोटे यांनी याबाबतची करुण कथा सांगितली आहे. डॉ. भारत लोटे यांना मार्च २०१७ मध्ये पॅन्क्रियाटिक कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्यावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्याचे ठरले. दीनानाथ रुग्णालयामध्ये भारत लोटे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांचा खर्च आणि आर्थिक ओझं इतकं वाढलं की काय करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर पडला होता. कमी पगारात संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी वाहिलेल्या या डॉक्टरांना इच्छामरणाची मागणी केली. आणि त्या स्थितीत जून २०१७ मध्ये डॉ. लोटे यांचे मंगेशकर रुग्णालयात निधन झाले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये लोटेंवर केलेल्या उपचाराचा खर्च ४० लाख रुपये सांगितला. रुग्णालयाने ४० लाखांचं बील काढलं इतकंच नाही तर रुग्णालयाने त्यांना ‘बिल भरा आणि मृतदेह घेवून जा’ असे सांगितलं त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी राज्य सरकार आणि वैद्यकीय विभागाकडे मदतीची याचना केली. पण त्याचा तेवढासा परिणाम झाला नाही. पैशाची अरेंजमेंट काही झाली नाही. २४ तास मृतदेह रुग्णालयातच पडून होता तरीही तो संगीता यांच्या ताब्यात दिला नाही. पुढे मुख्यमंत्री कार्यालय आणि वैद्यकीय विभागाच्या हस्तक्षेपामुळे डॉ. लोटे यांचा मृतदेह पत्नीच्या ताब्यात देण्यात आला, अशी सर्व घटना संगीत लोटे यांनी सांगितली आहे.
अंत्यविधीनंतरही रुग्णालयाकडून पाच लाख रुपये उरले म्हणून फोन येतच राहिले. या संपूर्ण दुःखद आणि संतापजनक अनुभवावर आधारित ‘इच्छामरण-एक सत्यकथा’ हे पुस्तक डॉ. लोटे यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई
-‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल
-‘रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका’; पालिकेने धाडली सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस
-अवघ्या ६ महिन्यात वाढले दीड लाख मतदार; पुण्यात ‘या’ भागात सर्वात जास्त मतदार