पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आण्णा बनसोडे यांची २ दिवसांपूर्वीच विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. मात्र आता आण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात आल्याचे दिसत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला आता महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शीलवंत यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. त्यामुळे आता बनसोडेंची आमदारकी धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आण्णा बनसोडे यांना २ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून आरोप केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे.
दरम्यान, तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आण्णा बनसोडेंना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, इच्छूकांची संख्या आणि मंत्रिपदे कमी असल्यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. नुकतीच बनसोडेंना अजित पवारांनी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार
-स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेचे पोलिसांवर गंभीर आरोप, थेट राज्याच्या सचिवांना लिहलं पत्र
-पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फी?
-थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला मायदेशी आणण्यात यश; मुरलीधर मोहोळांची संवेदनशीलता
-वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद पेटला? भूषणसिंहराजे होळकर काय म्हणाले? पहा व्हिडीओ