पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर पहाटेच्या अंधाराचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंद पडलेल्या बसमध्ये पहाटे हा प्रकार झाल्यानंतर पीडित तरुणी गावी निघाली होती मात्र, मध्यरस्त्यातून पुन्हा स्वारगेटला आली आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने यंत्रणा हालवत पोलिसांची ८ पथके तयार करत आरोपीचा शोध सुरु केला आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही!महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना – पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस!
स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
याहून धक्कादायक बाब म्हणजे…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 26, 2025
राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत?, असा सवाल आता विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
आरोपी फरार असून चौकशीसाठी पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. पहाटेच्या सुमारास बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यापाठीमागे जात तिच्यावर बलात्कार केला. पुणे शहर एकीकडे प्रगतीपथावर जात आहे तर दुसरीकडे शहरात अद्यापही महिला अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात
-अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?
-गुंडगिरीला वैतागले कोथरुडकर; चौकाचौकात बॅनरबाजी, काय आहे बॅनरवर?