पुणे : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात श्रीमती सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आली. या विरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवली. अशातच भाजप समर्थक देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनची वाट धरल्याने काँग्रेस आणि भाजप समर्थक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले आहे.
बालगंधर्व चौकात भाजप-काँग्रेस आमने-सामने आले आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘काँग्रेस भवनामध्ये आम्ही जाणारच नाही, राहुल गांधी-सोनिया गांधी यांना अटक करा’, अशी भूमिका भाजप समर्थकांनी केली आहे. काँग्रेस समर्थकही काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस भवनासमोर भाजपचे युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेस भवन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काँग्रेस भवनावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. पुण्यात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन जोरदार राडा पाहायला मिळत आहे. काँग्रेसने २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असून आता फेक नेरेटीव्ह पसरवण्यात येत आहे. त्यामुळे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अटक करावी, अशी आमची मागणी असल्याचे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
-वकिल महिलेला रक्त साकळे पर्यंत मारहाण; अजित पवार म्हणाले, ‘कायदा श्रेष्ठ’
-‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’; अजित पवारांचे नेते पडळकरांवर आक्रमक
-‘आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, महाराष्ट्रात रहायचं असेल तर…’; अजित पवारांचं वक्तव्य
-स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल
-‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?