पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माध्यमांसमोर येत मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड याच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत धक्कादायक आरोप केले होते. यावरुन त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे देसाई त्रस्त झाले असून त्यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.
संतोष देशमुख प्रकरणी सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया उमटत असून शाब्दिक वाद होत आहे. अशात राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर नेत्यांना ट्रोल करण्यात येत आहे. यावरुनच तृप्ती देसाई यांना देखील त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावर पुन्हा तृप्ती देसाई यांनी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.
‘धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, मी अजून फार काही बोललेले नाही. परंतु सातत्याने खालच्या पातळीवर ट्रोलिंग केली तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन’, असा इशारा तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे. तृप्ती देसाई यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
देसाई यांनी माध्यमांसमोर बोलताना अनेक गंभीर आरोप केले होते. ‘संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असताना देखील मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. वाल्मिक कराड हा १५ आणि १६ डिसेंबर रोजी नाशिकमधील एका मठामध्ये वास्तव्यास होता. तेथे आरोपीला लपण्यासाठी जागा दिली. त्यामुळे या मठाच्या प्रमुखांवर देखील कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-‘…म्हणून सैफ अली खान प्रकरणाला वेगळं वळण’; रोहित पवारांचा गंभीर आरोप
-मुंढव्यातील ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल
-राज्य मंडळाकडून ‘जात प्रवर्ग’चा निर्णय रद्द; 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नवे हॉल तिकीट
-सावकारी कर्ज आणि जाचाला कंटाळून पती-पत्नीनं आधी मुलाला संपवलं अन्…; नेमकं काय घडलं?