पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ मे रोजी होणार आहे. मतदानाला अवघे २ दिवस बाकी असल्यामुळे सर्व पक्षांच्या प्रचाराला जोर आला आहे. त्यातच आज पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पुणे शहरात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे, अहमदनगर, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहमदनगरच्या पारनेरमध्ये भर पावसात सभा घेतली आहे. तर पावसामुळे उद्धव ठाकरेंची जालन्यातील सभा रद्द झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. तसेच राजकीय सभांचेही वातावरण आहे. एकीकडे पुणेकरांना प्रचंड गर्मीतून पावसाने दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे राजकीय सभा रद्द झाल्या आहेत. राज ठाकरेंच्या सभेची जवळपास सगळी तयारी झाली असून आता सभा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘वेळीच सुधारा अन्यथा त्यांचे कामच करून टाकीन’; अजित पवार कोणाला दिला इशारा?
-पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, आता कोल्हे म्हणतात, “अभिनयातून ब्रेक घेतो पण…”
-‘काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मोदींची ऑफर
-“आपण कोणत्याही शूटिंगला जाणार नाही, त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी, विकास कामासाठी”- आढळराव पाटील