पुणे : “भाजप हा २ खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भाजपच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भाजपला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे”, असा घणाघात भाजपचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.
एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार शहराध्यक्ष घाटे यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. ते म्हणाले, ‘गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी सन २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास ताजा आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.
“अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत”
“भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ”
“राहता राहिला एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का?” असा सवालही यावेळी धीरज धाटे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच
-ठरलं तर! पुण्यात मोहोळांसाठी घुमणार मोदींचा आवाज! “या” तारखेला होणार जंगी सभा
-‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
-“नागरिकांना कायम उपलब्ध राहून काम करणार, हीच माझी गॅरंटी” – आढळराव पाटील
-इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव