पुणे : काश्मीर पहलगममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचेही निधन झाले. या दोघांचे पार्थिव आज पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. तसेच दोघांचेही अंत्यदर्शन घेतले. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांसमोरच अंगावर काट आणणारा अनुभव सांगितला आहे.
“आम्हाला तिथे बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली पण ती उशिरा झाली तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या, तुम्ही अजाण वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हंटल पण तरीही त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं. तिथे गेटवर एक मुस्लिम होता तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या”, असे कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितले.
“आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले. त्यांचा मित्र बाजूला होता त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो”, असंही कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-“माझ्या नवऱ्याचा चेहराही पाहता आला नाही”; शरद पवारांसमोर संतोष जगदाळेंच्या पत्नीचा टाहो
-शरद पवारांनी ठाकरेंना लिहिलेले ‘ते’ पत्र आयोगासमोर यायला पाहिजे; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
-पुणे महापालिकेत सरकारी नोकरीची संधी; कशी आहे अर्ज प्रक्रिया
-काश्मीरमध्ये हल्ला: काश्मीरमधील पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील जोडपे पुढे सरसावले
-फिरायला गेले ते परतलेच नाहीत! कश्मीर हल्ल्यात पुण्याच्या २ जिवलग मित्रांचा मृत्यू