पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर आता शहरात आणखी एक भीषण अपघात झाला आहे. या आपघातामध्ये भरधाव कारने दुचाकी स्वाराला जबर धडक दिली असून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे. त्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. कारचालक हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयुर मोहिते पाटील होते.
आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्याने अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्याने मद्यप्राशन केले होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यावर दिलीप मोहिते पाटलांनी देखील उत्तर दिले आहे. “माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यानं अॅम्बुलन्समध्ये टाकलं आहे. त्यामुळे इतर आरोपांत मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे यासर्व घडामोडींची मी नक्कीच शहानिशा करीन”, असे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालक मयुर मोहित पाटीलने दोघांना चिरडले त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांचे पुतणे मयुर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा
-आजारी बहिणीला संपवलं अन् रचला बनाव, १८ वर्षीय भावाचं चीड आणणारे कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं