पुणे : एकीकडे संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे तर दुसरीकडे पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडमधील आयटी हब हिंजवडीत स्पा सेंटरच्या नावाखाल वेश्याव्यवसाय सुरु आहे. या प्रकरणी चालक आणि मालकाचा अनैतिक मानवी वाहतूक विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ऋषीकेश मुकेश निकाळजे, गणेश राजाराम घेवडे आणि रितेश अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.
चिंचवडमधील आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये स्पाच्या नावाखाली पैशांचे अमिश दाखवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक विभागाला मिळाली. पोलिसांनी खात्री केली. मग, पोलिसांनी भूमकर चौकातील ‘द स्टीलर कॉप्लेक्स’ या स्पा सेंटरवर छापा टाकून ४ महिलांची सुटका केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलांना पैशाचे अमिश दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी स्पा मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भा.द.वी. कलम क्र. ३७० (३) , ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे ३, ४, ५, आणि ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात मोहोळांच्या बाईक रॅलीला मोठी गर्दी! नागरिकांकडून फुलांची उधळण करत स्वागत
-“२ वेळा बोललात, तिसऱ्यांदा बोलला तर करारा जवाब मिलेगा”; सुप्रिया सुळेंचा इशारा
-पुण्यातील वाहतूकीत ४ मे पासून महत्वाचे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, कोणता पर्यायी मार्ग?
-“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे”- अजित पवार