बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीची ही निवडणूक हाय होल्टेज निवडणूक होणार असून या निवडणुकीत पवार कुटुंबातील २ व्यक्ती आमने सामने आले आहेत. निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत गेले आणि पवार कुटुंबाच्याही विरोधात गेले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला.
त्यानंतर आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सुनेत्रा पवार मंगळवारी खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. तेथे त्यांनी भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांची भेट घेतली. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबातील बिघडलेल्या संबंधाबाबत भाष्य केलं आहे.
पवार कुटुंबाच्या नाराजीनंतर भूमिका स्पष्ट करीत सुनेत्रा पवारांनी कुटुंब एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “निवडणूक संपल्यानंतर आम्ही पवार कुटुंब येऊ शकतो, असे सुनेत्रा पवारांनी मीडियापुढे स्पष्ट केले. दरम्यान, सुनेत्रा पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर पवार कुटुंबातील अजित पवार आणि इतर सदस्यांमध्ये गोडवा येणार का हे पाहणं सर्वांसाठी औत्सुक्याचं आहे.
“बारामती लोकसभा मतदारसंघात फिरताना नागरिकांच्या प्रतिसादातून चांगले मताधिक्य मिळणार आहे. भोर एमआयडीसी आणि पुरंदर विमानतळाचा प्रश्न मतदारसंघात महत्त्वाचा असून, मी हे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून
-Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग