मावळ : पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे मतदान १३ मे सोमवारी पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यामध्ये लढाई झाली. बारणे आणि वाघेरे हे उमेदवार असले तरी मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे येथे मतदार कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २५८५०१८ मतदानापैकी १४१८४३९ म्हणजेच ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाकडून याबद्दलची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.८७ टक्के मतदान झाले आहे.
पनवेल ५०.०५ टक्के
कर्जत ६१.४० टक्के
उरण ६७.०७ टक्के
मावळ ५५.४२ टक्के
चिंचवड ५२.२० टक्के
पिंपरी ५९.५५ टक्के
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. त्यामुळे मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी सकाळी ७ वा. पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५१.५६ टक्के मतदान पार पडले आहे. सर्वात जास्त मतदान हे कसबा पेठमधून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कसबा पेठ – ५७.०९%
कोथरूड – ४९.०१%
पर्वती – ५२.४३%
पुणे कॅन्टोन्मेंट – ५०.५२%
शिवाजीनगर – ४९.७२%
वडगाव शेरी – ४९.७१%
महत्वाच्या बातम्या-
-आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले अन् मगच प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल
-पत्नी नांदायला येईना, पठ्याने दिली अख्या शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं काय घडलं?
-कर्वे रोड ते कर्तव्यपथ! मतदान संपताच लागले मोहोळांचे ‘खासदार’ म्हणून फ्लेक्स
-‘माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेय’- प्रवीण तरडे
-मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट