पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संकल्प पत्र जाहीर केले आहे. या संकल्प पत्राबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मत व्यक्त केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे. या संकल्पपत्रात १० वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला”, असे माधव भंडारी म्हणाले आहेत.
“२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत”, असे माधव भंडारी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर शरद पवारांनी ‘त्या’ वक्तव्यावर सोडले मौन, म्हणाले “अजित पवारांचा विधानावर मी फक्त….”
-दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस; मोसमी पावसाळ्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज
-Maval Lok Sabha | “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, समोर कोण उमेदवार..”- श्रीरंग बारणे
-डोक्यावर रखरखते ऊन तरीही सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू! धायरीत महिलांनी केलं जंगी स्वागत