मुंबई : काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री रकुल प्रित सिंगने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धीरज देशमुख यांच्यासाठी रकुलने तिच्या लग्नातील फोटो पोस्ट करत धीरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धीरज देशमुख यांच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रकुल व जॅकी यांचं फेब्रुवारी महिन्यात गोव्यात लग्न झालं. जॅकी हा धीरज देशमुख यांची पत्नी दिपशिखा यांचा भाऊ आहे. त्यामुळे दिपशिखा या रकुल प्रितची सख्खी नणंद आहे. रकुलने तिच्या लग्नाच्या एका कार्यक्रमातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रकुल आणि धीरज देशमुख हे दोघे सोबत डान्स करताना दिसत आहेत.
‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, येणारं वर्ष आनंदाचं जावो आणि या वर्षात तुम्हाला हवं ते सर्व मिळो,’ असं रकुलने या फोटोवर कॅप्शन दिले आहे आणि ती पोस्ट धिरज देशमुखांना टॅग करत लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आमच्याकडे अजून कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा…’; डॉ नीलम गोऱ्हेंचा विरोधकांना टोला
-Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
-बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवस उष्णतेत वाढीची शक्यता; रात्री उकाड्यातही वाढ!