पुणे : वाहनांना आकर्षक नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. नोंदणी क्रमांकांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच फायदा घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयात या क्रमांकाचा मोठा काळाबाजार सुरु आहे. यासाठी प्रादेशिक वहनमधील दलालांनी पर्यायी यंत्रणा उभारली आहे. प्रसंगी कर्मचाऱ्यांना धमकवले जात असल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.
महागड्या गाड्या खरेदी केल्यानंतर तिला नंबरही आवडीची असावी असा हट्ट अनेकांचा असतो. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करण्यासाठी अनेकांची तयारी असते. याचाच गैरफायदा आरटीओकडून अर्थिक वर्ष २००४-०५ पासून आकर्षक क्रमांकांचा लिलाव करण्यास सुरवात झाली. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळणारा महसूल वर्षानुवर्षे वाढत आहे.
आरटीओकडून आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांतून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यांच्याकडून या क्रमांकाचा काळाबाजार सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आरटीओत अनेक दलाल अशा धनाकर्ष विक्रीत गुंतलेले आहेत. आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करणारेही काही दलाल आहेत. लिलावावेळी हे दलाल ठरावीक आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला गाठतात. त्याच्याकडे पैशाची मागणी करतात. त्याने पैसे न दिल्यास लिलावात बोली लावून तो क्रमांक खरेदी करून दुसऱ्या व्यक्तीला विकण्याची धमकी देतात. याचबरोबर ठरावीक क्रमांकासाठी आरटीओतील कर्मचाऱ्यांवरही दबाव आणला जातो, असेही सांगण्यात आले आहे.
आकर्षक क्रमांकासाठी सुरुवातीला क्रमांकनिहाय निश्चित केलेले शुल्क भरावे लागते. हे शुल्क धनाकर्षाद्वारे भरावे लागते. आरटीओतील दलालांनी यासाठीच्या धनाकर्षाची बेकायदा विक्री सुरू केली आहे. समोरच्या व्यक्तीला किती तातडीची गरज आहे, त्यानुसार या धनाकर्षाची किंमत वाढत जाते. अशा पद्धतीने पुणे आरटीओमध्ये काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा
-…म्हणून पंतप्रधान मोदींची सभा एस. पी. मैदानावर नाही तर शहरातील ‘या’ मैदानावर होणार
-ससूनमधील मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो दाखवत अजित पवारांनी काढले वाभाडे; तरीही कारवाई नाहीच
-शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!
-पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश