पुणे : राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या शिरुर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत होत आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघात ‘जनसंवाद’ बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत आहेत. या जनसंवाद मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय आणि घटक पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. महायुतीच्या वतीने आढळराव पाटील यांचा प्रचाराचा जोर भोसरी मतदारसंघात कायम आहे. आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना १ लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प केला आहे.
ठिकठिकाणी ‘जनसंवाद’ बैठका घेण्यात येत आहेत. याद्वारे भाजप आणि महायुतीचे केंद्र सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने घेतलेली महत्त्वकांक्षी निर्णय, कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याबाबत तळागाळातील नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. आमदार महेश लांडगे यांनी जनसंवाद मोहिमेबाबत बोलताना आढळराव पाटलांना निवडणूक देण्याचे आवाहन केले आहे.
“‘जनसंवाद’च्या माध्यमातून भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. या निवडणुकीत मतदार पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवतील आणि भारत एक बलशाली राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान करतील, असा विश्वास आहे. जनसंवाद बैठकांना नागरिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळत असून आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे”, असे महेश लांडगे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दिल्लीचं पथक मावळमध्ये आलंच नाही; बारणेंनंतर आता भाजपकडूनही दावा
-हिंजवडीत ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; पैशाचे अमिश दाखवून केला जात होता वेश्या व्यवसाय
-कसब्यात मोहोळांच्या बाईक रॅलीला मोठी गर्दी! नागरिकांकडून फुलांची उधळण करत स्वागत
-“२ वेळा बोललात, तिसऱ्यांदा बोलला तर करारा जवाब मिलेगा”; सुप्रिया सुळेंचा इशारा