पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडली आहे. एका बाजूला महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे मैदानात उभ्या ठाकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केलीय. तर सुप्रिया सुळे या देखील मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत.
शुक्रवारी राजगड तालुक्यातील विविध गावांमध्ये जात सुनेत्रा पवार यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या, यावेळी वडगाव झांजेमध्ये पोहचल्या असता त्यांचा गावाच्या वेशीपासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
यावेळी बोलताना राजगड, तोरणा या गडकोटांच्या कुशीत राजगड तालुक्यात पार पडलेला संपर्क दौरा म्हणजे महायुतीच्या विजयाची मिळालेली ग्वाही आहे. जनसागराच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्य आणि केंद्र शासनाचा माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहीन, अशी भावना यावेळी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या-
-आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार
-बारामती, शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू; ७ मे रोजी होणार मतदान
-पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी
-“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”