पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेचा असणारा बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात. नेहमी पवारांच्या लेकीला निवडून दिलं. यावेळी सुनेला निवडून द्या. जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पहायला मिळालं.
#WATCH | Pune: NCP candidate from Baramati, Sunetra Pawar gets emotional when asked about Sharad Pawar’s remark calling her ‘outsider Pawar’
Sunetra Pawar is the wife of Maharashtra Deputy CM Ajit Pawar and is contesting LS elections against NCP-SCP MP Supriya Sule from… pic.twitter.com/sJauAJa2fg
— ANI (@ANI) April 13, 2024
अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी ‘बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार, या दोन गोष्टी असतात’, अशी प्रतिक्रिया दिली होती. तुम्हाला यावर काय बोलायचं आहे, असं सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आले. यावर सुनेत्रा पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच यावेळी हे ऐकून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
-“नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला लोकसभा मतदारसंघ
-आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार
-बारामती, शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू; ७ मे रोजी होणार मतदान
-पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी
-“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”