बारामती : देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आणि पवार कुटुंबातील २ व्यक्ती आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची बनली आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवार असून या दोघींमध्ये मुख्य लढत होणार आहे. अशातच आता अजित पवार हे स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झालेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांती ही कोणती नवी खेळी तर नाही ना? असा हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अजित पवारांनीही उमेदवारी अर्ज घेतली असल्याची चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आज भवानीमातेचा प्रकट दिन; जाणून घ्या आजच्या दिवसाचे काय महत्व?
-“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी
-अखेर शरद पवारांनी ‘त्या’ वक्तव्यावर सोडले मौन, म्हणाले “अजित पवारांचा विधानावर मी फक्त….”
-दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस; मोसमी पावसाळ्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज
-Maval Lok Sabha | “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, समोर कोण उमेदवार..”- श्रीरंग बारणे