पुणे : महायुतीकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पुण्यातील हडपसरचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांना ठेवायचा की भाजपला ठेवायचा यासंदर्भात महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी टिंगरेंचे मताधिक्य कमी होऊ शकते हा मुद्दा उचलून भाजपने या जागेवर दावा केला. २०१९मध्ये सुनील टिंगरेंकडून पराभूत झालेले वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यावेळी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सुनील टिंगरेंचं नाव नसल्यामुळे आता जगदीश मुळीक यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
भाजपने अजित पवार यांच्यासमोर खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचे आणि आज राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार टिंगरेंचं नाव नसल्याने खडकवासला आणि वडगाव शेरी मतदारसंघांची आदलाबदल होण्याचा चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, काल भाजपचे माजी आमदार आणि वडगाव शेरीमधुन इच्छुक असणारे जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जगदीश मुळे यांनी ‘लढेंगे जितेंगे’ हे व्हाट्सअप स्टेटस अपडेट करत आपण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला. जगदीश मुळीक यांच्या या स्टेटसनंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यालयात अचानक हालचाली पाहायला मिळात असून प्रचार साहित्य गोळा करण्यास सुरुवात झाली होती.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आले होते. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा टिंगरेंकडून प्रयत्न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या कार प्रकरणावरुन सुनील टिंगरेंचा पत्ता कट झाला असावा, अशा चर्चा आता संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच
-जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना
-विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल
-महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! चंद्रकांत पाटलांनी प्रचारही सुरू केला; उमेदवारी अर्जही दाखल करणार
-खेड-शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशाबाबत रोहित पवारांचं वक्तव्य; “पहिली २५ कोटींची खेप पोहचली”