लखनऊ : सध्या विवाह करणं चांगलंच अवघड होऊन बसलंय. त्याची कारणंही तशीच आहेत. विवाह करताना फसवणूक झाल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. आता उत्तर प्रदेशमधील अलिगडमधून एक अशीच विवाह संदर्भातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा-मुलीचा साखरपुडा सोहळा सुरु असताना तिथे अचानक पँट शर्ट घातलेल्या मुलीने गोंधळ घातला. वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा धक्कादायक आरोप तरुणीने केला आहे. तरुणीच्या या आरोपाने साखरपुड्यासाठी उभ्या असलेल्या वर चक्रावून गेला.
अलिगडच्या बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या तरुणासोबत निश्चित झाले होते. काल रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधी पार्क परिसरातील रुबी हॉटेलमध्ये मुलीच्या साखरपुडा सोहळ्याचा कार्यक्रम होता. वधू-वर दोघेही स्टेजवर उभे होते. तेवढ्यात दुसरी मुलगी तिथे पोहोचली आणि नवरीला हाताला धरून एका रुममध्ये घेऊन गेली. यावरुन दोघीमध्ये कडाक्याचं भांडणही झालं. हे भांडण सोडवण्यासाठी अखेर पोलिसांना बोलवावं लागलं.
ख़बर अलीगढ़ से अजब प्रेम की ग़ज़ब कहानी सामने आयी है।
क्या दो लड़कियाँ आपस में प्रेमी प्रेमिका हो सकती हैं?🤔
एक सगाई समारोह में उस समय हंगामा मच गया जब एक पेंट शर्ट पहने लड़की ने स्टेज पर पहुंचकर दुल्हन को अपनी प्रेमिका बता दिया 😳
पैंट शर्ट पहने लड़की ने दावा किया है कि हम… pic.twitter.com/mr02PoTBLS
— Dr. Jyotsana (jyoti) (@DrJyotsana51400) March 5, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत्या. गेल्या ४ वर्षांत या दोघींना एकमेकांना अनेक गिफ्ट्स दिले होते. रात्रंदिवस या फोनवर देखील बोलत असायच्या. काही काळानंतर या दोघी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्या होत्या. या दोघींमध्ये अनेकदा भांडणं झाली असून त्यांचे नाते तिन वेळा तुटले होते. त्यामुळे एका मुलीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या संपूर्ण प्रकारावरुन मोठा वाद झाला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या गदारोळानंतर साखरपुड्यासाठी आलेल्या नवऱ्या मुलाने आपली वऱ्हाडी मंडळ माघारी नेले अन् त्या मुलीशी लग्न करण्याचा विचार सोडून दिला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं चाललंय काय? खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण
-धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं आता आमदारकीही जाणार? धक्कादायक माहिती आली समोर
-नैतिकतेच्या आधारावर राजीनामा, पक्षाकडून पत्रक जारी; मुंडेंचा राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
-मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं महागात; गुंड गजा मारणेची तरुंगात रवानगी
-रणवीर अलहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; ‘पॉडकास्ट सुरू करता येणार, पण…’