पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी तसेच त्याच्या सोबत अपघातावेळी असणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलमध्ये बदल करण्यात आला होता. आरोपी आणि पोर्शेमधील आणखी दोघांच्या ब्लड ग्रुपशी जुळणाऱ्या ब्लड ग्रुपच्या त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.
अग्रवाल कुटुंब आणि ससून रुग्णालयाकडून आरोपींना वाचवण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्याचे आता समोर आले आहे. आरोपी आणि त्याच्या २ मित्रांना वाचवण्यासाठी त्यांचे ब्लड सॅम्पल हे तिघांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा ३ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले गेले ३ अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ब्लड ग्रुपची ज्यांचे रक्तगट जुळतात अशा ३ व्यक्तींना अपघाताच्या रात्रीच ससूनमध्ये आणण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
अपघाताच्या रात्री २ व्यक्ती कारमधून आल्या आणि त्यांनी अतुल घटकांबळे या ससूनच्या कर्मचाऱ्याशी पैशाची बोलणी केली. त्यामुळे रक्त देणाऱ्या ३ व्यक्ती आणि त्या रात्री गाडीतून आलेल्या २ व्यक्ती आता पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. बिल्डर विशाल अग्रवालचा अल्पवयीन आरोपी मुलगा आणि त्याचे २ अल्पवयीन मित्र रात्री मद्यधुंद अवस्थेत नव्हते, हे सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करण्याचा सल्ला ससूनमधील डॉ. अजय तावरे यांनी दिला.
डॉ. तावरेंचा सल्ला ऐकून तिघांच्या ब्लड सॅम्पल ऐवजी त्यांच्या घरातील मिळतेजुळते ब्लड सॅम्पल घेतले गेले. आरोपी अल्पवयीन अग्रवालसाठी एका महिलेचे रक्त घेण्यात आले आणि इतर दोघांसाठीदेखील दुसऱ्या व्यक्तीचे रक्त घेण्यात आले आणि हेच सगळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-स्वा. सावरकरांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बारमध्ये कठोर नियम लागू; रात्री किती वाजेपर्यंत सुरु राहणार?
-तुमची मुले मोबाईलमध्ये अडल्ट Video पाहतात का? मग आजच मोबाईचे ‘हे’ सेटिंग्ज चेंज करा
-महिलांसाठी महत्वाची बातमी; दरवर्षी करा ‘या’ ६ मेडिकल टेस्ट नक्कीच करा, टळू शकतो गंभीर आजारांचा धोका
-पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर; चर्चेला उधाण