पुणे : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ड्रग्ज प्रकरणावरुन राजकीय वाद उफाळत आहे तर दुसरीकडे पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जात होते. त्याची ओळख आता बदलत चालली आहे का? तरुण, तरुणी पुण्यात सुरक्षित आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरामध्ये अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखी एक प्रकार समोर आला आहे. यामुळे सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य प्रतिक्रिया दिली आहे.
काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आली असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना आणि…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 23, 2024
“काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आली असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॅाटेलचे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘नाईट लाईफ’ला बंदी नाहीच; शहरातील ‘त्या’ हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य अन् ड्रग्ज पार्टी
-आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग
-शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा