पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा केंद्रात राज्यमंत्री पद स्विकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ पुण्यात येताच ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. पुण्यात येताच मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या प्रश्नांबाबत रविवारी बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये पुण्याच्या अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली आहे.
पुणे शहरातील अनेक दिवस प्रलंबित असलेले पुण्याचे नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
पुणेस्थित वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान में भेंट की और कामकाज का जायजा लिया । यह राष्ट्रीय संस्था सहकारिता मंत्रालय के अंतर्गत पुरे देश में सहकारिता की जड़े मज़बूत करने में योगदान दे रहीं हैं।
सहकारिता, कृषि और ग्रामीण विकास के लिए एक बौद्धिक केंद्र बनना, यह इस… pic.twitter.com/hY5QjIRmCg
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 16, 2024
“पुणे विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी आवश्यक असलेल्या ३५ एकर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या निधी पैकी ६० टक्के निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उर्वरित ४०टक्के रक्कम ही पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल
-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला