पुणे : पुणे शहरात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र पुण्यातील काँग्रेस-भाजपमधील कार्यकर्त्यांचा वाद काही संपत नसल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे. पुण्यातील भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप करत रात्री उशिरा सहकार नगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोल केले. आता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे.
पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत. ‘फडके हौद चौकात काँग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नाही’, असा आरोप करत भाजपकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. हे बॅनर काँग्रेसकडून लावण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात अशा प्रकारचे बॅनर लावून मतदारांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप हेमंत रासने यांनी केला जात आहे.
दरम्यान, मतदानाच्या २ दिवसांपूर्वी ११ मे रोजीचा प्रचार संपला त्यानंतर कोणत्याही प्रकारे प्रचार करता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी देखील १०० मीटर दूरपर्यंत साधारण काही पोस्टर किंवा प्रचारार्थ काही करता येत नाही. तरीही काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचे चिन्ह असलेले बॅनर मतदान केंद्रावर लावले आहे. अशा प्रकारचे बॅनर लावण्यास बंदी असून हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. सगळ्या बेकायदेशीर गोष्टी करण्याची धंगेकरांची परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशा मागण्या हेमंंत रासने यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-७०० रुपयांचे आंबे मिळणार ३०० रुपयांत, फक्त करा मतदान; पहा पुण्यात कुठे मिळणार ही भन्नाट ऑफर
-धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?
-राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?
-पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा