पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील यांनी महिनाभरापूर्वी मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र तो स्विकारला गेला नव्हता. यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर उमेश पाटलांचे राजीनामा पत्र प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यानंतर आता उमेश पाटील यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.
एकीकडे उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली आहे. मात्र, उमेश पाटील हे अजित पवारांसोबत असताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार रोहित पवार यांनी उमेश पाटलांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला आहे. उमेश पाटील थोड्याच वेळात सिल्वर ओकला शरद पवारांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
“स्पष्ट बोलणारा मी कार्यकर्ता आहे. उमेश पाटलांचा जर प्रवेश होत असेल, तर आम्ही कार्यकर्ता म्हणून नाहीतर कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता म्हणून त्याला पाठिंबा देत नाही. त्याचा विरोध आम्ही पदाधिकारी म्हणून आमच्या नेत्यांसमोर दर्शवू”, असं म्हणत रोहित पवारांनी उमेश पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे.
“शेवटी प्रवेश कोणाचा घ्यायचा? कधी घ्यायचा? पक्षश्रेष्ठींचा तो विषय आहे. पण, कार्यकर्ता म्हणून मला जर तुम्ही विचारलं, शरद पवारांबद्दल आणि सुप्रिया सुळेंबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उमेश पाटील बोलले आहेत. अशा प्रकारचा प्रवेश जर होत असेल, तर मी कार्यकर्ता म्हणून आणि आमच्यात लोकशाही मानसन्मान आहे. पवारसाहेब नक्कीच आमच्या भूमिकेवर, नाहीतर आमच्या म्हणण्याला तिथं तेवढंच वजन देतील”,असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना
-विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल
-महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! चंद्रकांत पाटलांनी प्रचारही सुरू केला; उमेदवारी अर्जही दाखल करणार
-खेड-शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशाबाबत रोहित पवारांचं वक्तव्य; “पहिली २५ कोटींची खेप पोहचली”
-कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट