पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून ४८ जागांवरील उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. या संदर्भात आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
‘पुढील दीड महिन्यात श्रीरंग बारणे हेच खासदार असतील’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे हेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांनी नुकतंच ते कुठल्या पक्षातून आणि कुठल्या चिन्हावर लढणार याबाबत बोलणं टाळलं होतं. ‘मी केवळ महायुतीचा उमेदवार असेल’ असं ठामपणे बारणे यांनी सांगितलं होतं.
‘माझं मन सांगत आहे. श्रीरंग बारणे हेच दीड महिन्यानंतर निवडून येतील. खासदारकीसाठी मी कुठेही इच्छुक नाही. त्यामुळे मी लढण्याचा प्रश्न येत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जिल्हा शिवसेनेला मिळावा. हा आमचा दावा आहे. तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. ते आमच्या सोबत आले नाहीत हे दुर्दैव आहे’, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराचा नारळ फुटला; कै. गिरीश बापटांच्या प्रतिमेला अभिवादन
-‘..तर आमदाराकी सोडावी लागेल’; अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा
-‘बारामतीचा विकास माझ्यासारखा कोणीच करू शकत नाही’; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
-भाजपकडून मोहोळांना उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
-भाजपने तर डाव टाकला आता काँग्रेस काय खेळी खेळणार; मोहोळांना टक्कर देण्यासाठी कोणाला देणार उमेदवारी?