पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात ‘मिशन टायगर’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. सुरवातील ‘मिशन टायगर’ अंतर्गत ठाकरे सेनेमधील नाराज नेते, कार्यकर्त्यांना शिंदेंनी आपल्या शिवसेनेत दाखल करुन घेतलं. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या मिशन टायगरची चर्चा रंगली. पुण्यात मात्र याला ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. अशातच आता उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज भल्या सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात झालेल्या भेटीनंतर दोघांमध्ये बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र आता याबाबत उलगडा झाल्याचे बोलले जात आहे.
‘मिशन टायगर’ अंतर्गत शिंदेंच्या सेनेने ठाकरे सेना आणि काँग्रेसमधील नाराज नेत्यांसोबतच मनसेच्या देखील नाराजांना आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मनसेच्या जिल्हा अध्यक्षांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करपण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदेंच्या नेत्याकडून मनसेच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांना फोन करण्यात आले. नेत्यांना विविध मंडळ देण्याची आश्वासने देण्यात आली. या सर्व नेत्यांना मंत्री उदय सामंत यांनी फोन केला असल्याची चर्चा रंगली. त्यानंतर राज ठाकरेंनी स्वत: या सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेतली होती. राज ठाकरेंनी यावेळी जिल्हाध्याक्षांना सबुरीचा संदेश दिला तर दुसरीकडे आज झालेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांना आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच उदय सामंतांना खडेबोल देखील सुनावले असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट
-रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?
-अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल
-Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…